मराठा आरक्षण : …तर सत्ताधारी आणि विरोधकांना नग्न करून मारू, छावाची धमकी

Maratha Arakshan

नांदेड : ‘सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा, उग्र आंदोलन करू. सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार नाही पण सत्ताधारी आणि विरोधकाना नग्न करून मारू,’ अशी धमकी छावा संघटनेचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. नांदेडमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेची मराठवाडा विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी उग्र आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधकांनाही उल्लेखित धमकीवजा इशारा देण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा केंद्र आणि राज्य सरकारकडून चेंडू बनवला असल्याची भावना मराठा समाजात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी २१ सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातून आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कोरोना काळात सर्व नियम पाळत हे आंदोलन होईल.

मराठा समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात याबाबत जनजागृती सुरू आहे.

मराठा समाजातील अनेक कुटुंबांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाची आवश्यकता आहे. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले त्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी आणि तरूणांना या आरक्षणाचा फायदा झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER