मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली

Maratha-Reservation-Supreme Court

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खडंपीठासमोर आज झालेल्या युक्तीवादात, सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा युक्तीवाद झाल्यानंतर, न्यायालयाने ही सुनावणी ४ आठवडे पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपलं म्हणणं मांडावं असंही कोर्टाने नमूद केलं.

आज कोर्टात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्य सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ते मुकूल रोहतगी सुरुवातीच्या सुनावणीला उपस्थित नव्हते. त्यामुळे न्यायालयाने काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. मग दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी मुकूल रोहतगी यांनी कोर्टाकडे विनंती करुन हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावं किंवा ४ आठवडे मुदत द्यावी असं म्हटलं. त्यावर कोर्टाने चार आठवड्यांसाठी तहकूब करतानाच, आज आम्ही काहीही करू शकत नाही. याचिकाकर्त्याने घटनापीठाकडेही म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, आम्ही उद्याच घटनापीठाकडे जाणार असल्याचे मराठा संघटनेचे नेते विनोद पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER