अशोक चव्हाणांमुळेच मराठा आरक्षण रखडले; विनायक मेटेंचा आरोप

Maharashtra Today

मुंबई :- आजपासून सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून कुठलीही ठोस तयारी झालेली नाही. सरकारची रणनीती बोगस आणि अत्यंत अव्यवहारी असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, खरं तर आतापर्यंत जी वाताहत झालेली आहे आणि अंतिरिम स्थगिती आलेली आहे;  ती केवळ आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाली आहे. हे अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणाचे फळ आहे. या सरकारने याचिकाकर्त्यांची एकत्रित बैठकही घेतलेली नाही. तर एका बैठकीला स्वत: अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यांनी सगळे प्रकरण वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे त्यांच्याबदल न बोललेले  चांगले आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याबद्दल चांगले  बोलण्याच्या बाबतीत काही शब्द नाही, अशी टीका मराठा आरक्षणावरून विनायक मेटे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER