मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवार उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या (८ जून रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. यासोबतच शरद पवारही भेट घेणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील हे दोन्ही नेते मराठा आरक्षणावर चर्चा करतील . या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनी केली हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांच्या तब्येतीची केली विचारपूस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button