मराठा आरक्षण : शरद पवारांनी सांगितले पाच-सहा फार्म्युले : संभाजीराजे

Shambhaji Raje & Sharad Pawar.jpg

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाच-सहा फार्म्युले सुचवले, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असा आग्रहही संभाजीराजे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यात विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरू केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास राज्य सरकारच जबाबदार ठरवले जाते आहे. मराठा संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या विषयावर राज्यसभेत बोलताना संभाजीराजेंनी प्रश्न केला – तामिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे. यासाठी सर्वांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एक पत्र लिहिले आहे.

सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास ३३ टक्क्यांवर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दिशाभूल केली, असा समज समाजात पसरत आहे. मला वाटते की, हा समज दूर करण्याची वेळ आली आहे. सर्व खासदारांनी एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपण ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER