मराठा आरक्षण : मुख्यमंत्री-पंतप्रधान यांच्या भेटीतून नक्कीच तोडगा निघेल; राऊतांना विश्वास

Maratha reservation-CM Uddhav Thackeray-pm modi-Sanjay Raut

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) भेटणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीत नक्कीच मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यांनतर मराठा समाजानी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चेही निघत आहेत. आंदोलनही करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीरपणे विचार करत काळजीपूर्वक काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत. यांच्या भेटीतून नक्कीच आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट झाली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. हा मुद्दा अधिक काळ ताणला जाऊ नये, असे महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला वाटत आहे, असे सांगताच ओबीसी आणि मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होण्याची परिस्थिती आहे. कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या अख्त्यारीत गेला आहे. त्यामुळे केंद्रात हा विषय मांडणे, हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, असे राऊत म्हणाले.

विश्वास तोडल्याचे वाईट वाटते

यावेळी राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. आम्हालाही विश्वासघात केल्यावर वाईट वाटते. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिला आणि तो पाळला नाही. तो आजही टोचत आहे. त्यामुळे भाजपने पत्र, दगाबाजी वगैरे यातून बाहेर पडले पाहिजे, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button