विरोधी पक्षातील नेते असे भन्नाट आरोप करू शकतात; संजय राऊतांचा टोला

Chandrakant Patil-Sanjay Raut.jpg

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिउत्तर दिले. राऊत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.

पाटील यांनी केलेल्या आरोपांवरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले,”चंद्रकांत पाटील सध्या विरोधी पक्षामध्ये आहेत. विरोधी पक्षातील लोक अशा प्रकारचे भन्नाट आरोप करू शकतात. पण गेल्या काही वर्षांपासून सत्तेतील प्रत्येक पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शर्थ करत आहे. दुसरे असे की अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची समिती काम करत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावर काल निवेदन केले आहे.

मी या विषयावर जाहीरपणे बोलणार नाही, कारण मला तो अधिकार नाही. एकनाथ शिंदे त्या समितीवर आहेत. शरद पवार यांनीही दिल्लीत त्यावर भूमिका मांडली आहे. त्यामुळे कोणताही नवा वाद निर्माण होईल असे मी कोणते ही वक्तव्य करणार नाही. या समाजाला, बहुजन समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, या मताचा मी आहे,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER