मराठा आरक्षण : खा. संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Sambhaji Chhatrapati

मुंबई : गेले तीस वर्षापासून मराठा समाजाने (Maratha Reservation) ज्याआरक्षणासाठी लढा दिला, तेच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी स्पष्ट केले.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास म्हणून सिद्ध झालेला आहे. इतर कोणतेही आरक्षण मराठा समाजाच्या हिताचे होणार नाही. E W S चे आरक्षण राज्याने मराठा समाजाला लागू केल्यास, सर्वोच्च न्यायालयामध्ये (SC)जी लढाई सुरू आहे त्यावर परिणाम होईल. परिणामी मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षणापासून मुकावे लागेल, अशी भीती मराठा समाजाला वाटत आहे.

2014 पासून ज्या पदांची भरती झाली होती. ती समांतर आरक्षणामुळे रखडले आहेत. त्या पदांसहित सर्वच पदांच्या पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्रे देण्यात यावे. मागच्या चालू वर्षांत शैक्षणिक प्रवेशांची कोणत्याही स्वरूपात हेळसांड होऊ नये. याची खबरदारी शासनाने घ्यावी. अशी मागणी मराठा समाजाने केली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडण्यासाठी स्वतः जाणार असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER