मराठा आरक्षण ; संभाजीराजे घेणार आज मुख्यामंत्री उद्धव ठाकरेंची भेट

uddhav thackeray & chhatrapati sambhaji raje bhosale

मुंबई : सरोचह न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा मुद्दा चांगलाच पेटला आहे . या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतील. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही ते भेट घेणार आहेत. गुरुवारी संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती.

मराठा समाज सध्या आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत.

मराठा समाजाच्या मनात असलेला असंतोष व्यक्त करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता एकूणच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून दौरा केल्यानंतर आणि सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना भेटल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button