मराठा आरक्षण : संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भूमिका मांडणार; राजीनामा देण्याची शक्यता

Sambhaji Raje -CM Uddhav Thackeray

मुंबई :- मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट होणार आहे. त्यांच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजे यांनी राज्यव्यापी दौरा केला. दौरा करून विविध संघटना आणि पक्षप्रमुखांची भेट घेत आहेत. त्यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांना भेटून भूमिका मांडणार आहेत.

संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी २७-२८ मे रोजी भूमिका मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आपली भूमिका मांडणार आहे. ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती नसून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

…तर राजीनामा देईन

“राजीनामा देऊन मराठा समाजाच्या (Maratha Community) आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी तत्काळ खासदारकीचा राजीनामा देईन.” असा इशारा संभाजीराजे यांनी सोलापूरच्या पत्रकार परिषदेत दिला होता. या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button