फक्त अल्टिमेटम नको, मराठा संघटनांना सोबत घेऊन मांडा भूमिका; विखे-पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

अहमदनगर : मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी संभाजीराजे यांना सल्ला दिला – राज्य सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडा. महाविकास आघाडी अपयशी ठरल्याने केंद्राकडे बोट दाखवत आहे.

स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ घालवते आहे. सरकारमधील मंत्री जी विधानं करत आहेत, त्यावरून सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही. सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर यावे. एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button