मराठा आरक्षण : उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांविरोधात याचिका दाखल करणार – विनायक मेटे

Uddhav Thackeray and Ashok Chavan - Vinayak Mete

बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मराठा समाजाला (Maratha Reservation) ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द केले. मात्र आजपर्यंत सरकारने काहीही हालचाल केली नाही. सरकार मराठा समाजाविरोधात विद्वेषाने वागते, अशी असल्याची टीका विनायक मेटे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात येत्या मंगळवारी औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

… त्यांना नियुक्तीचे आदेश द्या

याबरोबरच मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींनी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना ताबडतोब नियुक्तीचे आदेश द्या, अशी मागणी मेटेंनी केली आहे. अन्यथा याबाबतही न्यायालयात सामोरे जाण्यास तयार राहा, असा इशारा त्यांनी दिला. हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं आहे. ढुसणी दिल्याशिवाय हलणार नाही, अशी टीका विनायक मेटे यांनी दोन दिवसापूर्वी केली होती.

खोटारडे सरकार

महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. जेव्हा आम्ही सांगत होतो की SEBCच्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या. तेव्हा विद्यार्थ्यांना कोर्टात जा म्हणाले आणि आता मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. आजपर्यंत या सरकारने EWS चेही आरक्षण लागू केले नाही. ‘सारथी’चे विद्यार्थी पीएचडी करत आहेत. त्यांना एक दमडीही फेलोशिप मिळाली नाही. १७ तारखेला घरात राहून उपोषण केले. पण पोलिसांनी त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पत्र पाठवले. त्यांना शिकूही देत नाहीत, न्याय देत नाहीत असा संतप्त सवाल मेटे यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button