मराठा आरक्षण : मुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका; विनायक मेटेंची माहिती

Ashok_Chavan_Uddhav_Thackeray-Vinayak Mete

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केले. त्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. यामुळे मराठा आता खुल्या प्रवर्गात आलेला आहे. आम्ही राज्य सरकारकडे मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे नाकर्तेपणाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे, असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे. याचबबरोबर, त्यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, आता नोकऱ्या, अ‍ॅडमिशन सुरू होत आहेत. यासंबंधी लवकरात लवकर विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि राज्याचे सचिव यांना नोटिसा काढाव्यात.

मराठा आरक्षणाविरोधी बीडमध्ये ५ जूनला मोर्चा काढण्यात येणार आहे. शासन कोरोना असताना मोठमोठ्या पार्ट्या आणि निवडणुका घेत आहे. मग मराठा समाजावेळीच कोरोनाची बंधने का, असा सवालही मेटे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button