मराठा आरक्षण : आता महायुतीचे नेतेही पंतप्रधानांना भेटणार; आठवलेंचे विधान

Ramdas Athawale

नागपूर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीनंतर आता महायुतीचे नेतेही येत्या २० तारखेनंतर मोदींची भेट घेणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले.

रामदास आठवले यांनी नागपुरात असताना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, येत्या २० जूननंतर युतीचे नेते पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) भेटणार आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण आणि वादळामुळे नुकसानग्रस्तांना झालेल्यांना भरपाई मिळावी. तसेच अनेक मुद्द्यांवरही पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येईल. सोबतच क्षत्रियांना १० टक्के आरक्षण मिळावे, या मुद्यावरही मोदींशी चर्चा करण्यात येणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

सरकारला अपयश
“राज्यात आरक्षण हे मोठे विषय आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने योग्यप्रकारे भूमिका मांडली नाही. मराठा समाज राज्यकर्ता आणि श्रीमंत आहे. असे कोर्टाला वाटते. परंतु, त्या समाजात बरेच लोक गरीब असून त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्यांचे आरक्षण नाकारण्यात आले. मर्यादेच्या पुढे जाऊन त्यांना ५० टक्के आरक्षण देता येऊ शकते. हे कोर्टाला पटवून देण्याची गरज आहे. आघाडी सरकारने पदोन्नती आरक्षणाबाबत घातकी भूमिका घ्यायला नको होती. हे सरकार दलित विरोधी आहे. त्यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. हे सरकार किती दिवस टीकेल सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखविले जाते.” असे आठवले म्हणाले.

मुख्यमंत्रीपद वाटून घ्या
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर हे सरकार अस्तित्त्वात आले नसते. भाजपसोबतच सरकार स्थापन केले असते. आताही अडीच-अडीच वर्षे शिवेसना आणि भाजपने सरकार स्थापन करण्याचा विचार करावा आणि उद्धव ठाकरे-फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे. मोदींसोबत उद्धव ठाकरेंचे चांगले संबंध असल्यामुळे हा फॉर्म्युला ठाकरेंनी स्वीकारावा. तसेच चंद्रकांत पाटील यांनीही वाघासोबत दोस्ती करायला हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोघांनीही आता पुढे यावे, असे आवाहन आठवलेंनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button