मराठा आरक्षण : मूक नव्हे तर ‘बोलका’ मोर्चा काढणार; विनायक मेटेंचा इशारा

vinayak mete - Maharashtra Today

पुणे :- भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आजपासून मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी याच प्रश्नावर ‘मूक नव्हे तर बोलका मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाचा इशारा दिला.

“मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यावरही राज्य सरकारने गाढवपणा केला आहे. यामुळेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचा मूक मोर्चा नसेल तर तो बोलका मोर्चा असेल. या मोर्चातुन आम्ही सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणार आहोत.” असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.

खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) चांगले काम करत आहेत. पण त्यांनी अजूनही भूमिका घेतलेली नाही. मात्र, आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या (Maratha Community) आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या २७ मे रोजी ते भूमिका घेणार आहेत. त्यांनी भूमिका घेतल्यानंतर यावर अधिक बोलता येईल, असे मेटे म्हणाले.

वडेट्टीवारांना ओबीसी नेता व्हायची घाई

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना सध्या ओबीसी नेता होण्याची घाई झाली आहे. ते मराठा आरक्षणासंदर्भात काय बोलतात, याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. काँग्रेसमध्ये ओबीसी नेता होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. वडेट्टीवार मोठे की नाना पटोले मोठे यावरून काँग्रेसमध्ये वाद आहे, असा दावाही मेटे यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणासाठी भाजप पुरजोर प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button