मराठा आरक्षण : अध्यादेश नको, अंतिम सुनावणीची मागणी करा – राजेंद्र कोंढरे

Rajendra Kondhre

पुणे : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने, समाजात प्रचंड नाराजी आहे. यासाठी राज्य सरकारने अध्यादेशाचा पर्याय न स्वीकारता आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवून अंतिम सुनावणीची मागणी केली पाहिजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhre) यांनी पत्रकार परिषदेत केली.

या संदर्भात राज्यातील अनेक भागात बैठका सुरू आहेत. राज्य सरकारने योग्य बाजू न्यायालयात मांडावी यासाठी, मराठा समाज १७ सप्टेंबर रोजी, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार आहे, असे ते म्हणाले.राजेंद्र कोंढरे म्हणाले की, मराठा समज आरक्षणाच्या मागणीसाठी कित्येक वर्षांपासुन लढा देत आहे. आता न्यायालयाने स्थगिती दिल्याने, समाजातील तरुण चिंतेत पडला आहे. राज्य सरकारने अध्यादेश न काढता स्थगिती उठविण्यासाठी न्यायाधीशांना विनंती करावी.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. त्या दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आलेले नाहीत. सरकारने केवळ घोषणा न करता गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी जी प्रवेश आणि नियुक्त्यांबाबत निवड जाहीर झालेली आहे. त्या सर्व संरक्षित कराव्यात. आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे, ते शासनाने होऊ देऊ नये.  सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश जाहीर झाल्यावर, तो आदेश न्यायालयाच्या वेबसाईटवर आला  सताना. शिक्षण विभागाने मराठा समाजाच्या प्रवेशावर तातडीने स्थगिती देऊन चूक केली, असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER