मराठा आरक्षण : महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली संभाजीराजे यांची भेट

महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली घेतली खा. संभाजीराजे यांची भेट

नवी दिल्ली : मराठा आरक्षण (Marathi Reservation) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खा.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यासह खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार हीना गावित, खासदार प्रीतम मुंडे, खासदार भारती पवार यांनी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची भेट घेतली.

या भेटीवेळी मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, त्यातील न्यायालयीन बाबी, सर्व घडामोडी व या विषयातील सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केले. यावेळी या सर्वांनी मराठा आरक्षण लढ्यासाठी आम्ही खंबीरपणे आपल्यासोबत आहोत, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांना दिली. तसेच चर्चेदरम्यान खासदार संभाजीराजे यांना आपण स्वतः पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी अवगत करावे. तसेच या बाबतीत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, अशी विनंती खासदार संभाजीराजे यांना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER