मराठा आरक्षण आंदोलन : उद्यापासून पुणे – मुंबईचा दूध पुरवठा तोडणार

maratha Reservetion & Milk

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेले मराठा आंदोलन मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी विविध मराठा संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनात उद्यापासून पुणे, मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद पाडण्याचा इशारा मराठा समाज आंदोलकांनी दिला. त्यामुळे बऱ्याच भागात दूध पुरवठा उद्या खंडित होणार आहे.

गोकुळ, वारणा, चितळे यासह मोठ्या प्रमाणात होणारा दुधाचा पुरवठा होऊ देणार नाही. दुधाचे टँकर अडवू, असे आंदोलनाच्या नेत्यांनी म्हटले आहे. आता पर्यंत अनेक मराठा मोर्चे शांततेत पार पडले, सामान्य नागरिकांना त्रास झाला नाही. मात्र आता आक्रमक होण्याची गरज असून सरकारने लवकरात लवकर योग्य पाऊल उचलावे अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER