मराठा आरक्षण : कोल्हापुरात मराठा मोर्चा १६ जूनला, तर सोलापुरात भव्य मोर्चाची तयारी सुरू

Maratha reservation

सोलापूर :- राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण चांगलेच तापले आहे. आता सोलापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरू आहे. संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येईल. संभाजीराजेंनी रायगडावरून १६ जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. यासाठी संभाजीराजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्याशी चर्चा सुरू आहे. यांच्या चर्चेनंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन्ही राजे एकत्र आल्यास मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

मराठा मोर्चा १६ जूनला

संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून काढण्यात येईल, अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button