… मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता नाही आले; नरेंद्र पाटलांची टीका

narendra patil

नांदेड : तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले पण सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही. अशी टीका मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर केली.

ते म्हणाले, आरक्षणासाठी जेव्हा लाखोचे मोर्चे निघाले तेव्हा त्या काळातील विरोधीपक्षाचे आमदार-खासदार मोर्चात सहभागी झाले. अशोक चव्हाण देखील सहभागी झाले होते. पण आता सत्ता असताना, स्वत: उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांना आरक्षण टिकवता आले नाही. अशोक चव्हाण यांनी मराठा नाव लावू नये, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणालेत, अशोक चव्हाण यांना आरक्षणाची गरज नाही. पण शेतकरी कष्टकरी कामगार यांना आरक्षण हव आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक मराठा आमदार आहेत. पण ते विधानसभेत बोलत नाहीत. त्यांना लाज नाही. ते सर्व घराचा दरवाजा लावून बसले आहेत. त्यांच्या xxxx वर लाथ मारा.

मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवा आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेना समितीचे अध्यक्षपद द्या, असं नरेंद्र पाटील यांनी कराड येथे सांगितलं होत. अशोकराव चव्हाणांनीच मराठा समाजाला ‘थर्ड’ लावला, असा आरोप देखील नरेंद्र पाटील यांनी केला होता.

माजी मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता, अस नरेंद्र पाटील म्हणाले. विद्यामान अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचं मोठ नुकसान झाल आहे, असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER