मराठा आरक्षण : उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

Maratha reservation.jpg

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर उद्या 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र, हा बंद आता मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मराठा संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अपेक्षित आणि यशस्वी चर्चा झाली असून उद्याचा बंद हा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने 10 ऑक्टोबरचा बंद मागे घेतला, असे मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.

सुरेश पाटील य़ांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून 1 महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. याशिवाय MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले, महिन्याभरात आम्ही दोन्ही प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन सरकारकडून मिळाल्यामुळे आम्ही तात्पुरता बंद मागे घेत असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER