मराठा आरक्षण : क्रांती मोर्च्याकडून आंदोलनाच्या तारखा जाहीर

मुंबई : तत्कालीन फडणवीस सरकारने (Fadnavis govt) दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करता वेगवेगळ्या तारखांना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलन होतील. तसेच बंदची हाक देण्यात येईल. येत्या २१ सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. तर मुंबईत २० सप्टेंबरला ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी येत्या २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची रणनीती ठरवली जाईल. राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच येत्या १७ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER