मराठा समाजाचे नेतृत्व कोणीही करावे फक्त आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे : उदयनराजे भोसले

Udayan Raje Bhosle

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे . आरक्षणासाठी मराठा समाजाचे ठिकठिकणी आंदोलन सुरुच आहे मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, ही रास्त मागणी आम्ही करत आहोत.

या समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा त्यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, तो सुटणे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी व्यक्त केले. जलमंदिर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते बोलत होते .

शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन दि. ३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणा-या मराठा समाजाच्या विचार मंथन बैठकीसाठी आमंत्रण दिले. या आमंत्रणाचा स्वीकार दोघांनीही केला, तसेच या बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील दिले.

ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या समाजातील पुढची पिढी सध्या हतबल अवस्थेत आहे. गुणवत्ता असूनही शिक्षण आणि नोकरीमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने या समाजातील मुले-मुली चिंताग्रस्त आहेत. इतर समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, असे आम्ही म्हणत नाही तर इतर समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्याच पद्धतीने मराठा समाजही अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. त्यांनादेखील आरक्षणाचा लाभ देऊन त्यांच्या भविष्याची चिंता मिटवावी, अशी आमची मागणी आहे. पुण्यात होणा-या बैठकीत याबाबत सविस्तर विचार मंथन होईल, मी या बैठकीला जाणार आहे. मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा समाजाचा प्रश्न गांभीर्याने सुटणे महत्त्वाचे असल्याचे उदयनराजे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER