मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य मार्ग काढतील ; खासदार संभाजीराजेंचा विश्वास

Chhatrapati Sambhaji Raje -Uddhav Thackeray.jpg

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केल्यानंतर मराठा समाज चांगलाच पेटला आहे . आरक्षणाच्या लढाईसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) मैदानात उतरले आहे . यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यावेळी राज्यात उद्रेक झाला नाही, असे स्पष्ट करतानाच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य मार्ग काढतील, असा विश्वास व्यक्त केला.

सिंधुदुर्ग दौऱयावर असलेल्या संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख 4 जून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर मार्ग काढू असे सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नक्कीच यातून योग्य मार्ग काढतील, असा विश्वास आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी 6 जून रोजी मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. त्या आधी राज्य सरकारने मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य कराव्यात. मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला. हे सगळे असले तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणे चुकीचे नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button