‘काय जोर लावायचा तो लावा आणि मराठा आरक्षण टिकवा’, संभाजी राजेंचे आवाहन

Sambhaji Raje

जालना : मराठा समाज (Maratha Community) सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध झालं आहे. आता काही लोक म्हणतात या समाजाला आरक्षण नको, तर काही लोक म्हणतात ओबीसीमध्ये आरक्षण (OBC Reservation) घेऊ. पण या घडीला तरी आपलं लक्ष फक्त एसईबीसी आरक्षणाकडे असलं पाहिजे. त्यामुळे दुसरी लाईन पकडायची नाही. आता फक्त एसईबीसी आरक्षण कसं टिकवायचं याचाच विचार करायचा आहे, असं संभाजीराजे म्हणाले. काय जोर लावायचा तो लावा आणि हे आरक्षण टिकवा, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना माझी विनंती आहे , अस भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी व्यक्त केला. (BJP MP Sambhaji Raje on Maratha reservation)

यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने काय जोर लावायचाय तो आत्ताच लावावा, पण मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. एसईबीसी आरक्षण टिकावे, हीच सकल मराठा समाजाची भूमिका आहे. ओबीसी, एसटी आणि एससी हा समाजदेखील माझाच आहे. मला त्यांच्यासाठीही बोलायचे आहे. पण सध्या मराठा आरक्षण (Maratha Reservation)) हा माझ्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. हे आरक्षण मिळेपर्यंत मी मराठा समाजासोबत राहणार. भविष्यात मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, अशी इच्छा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

मी या परिषदेला चार्टर प्लेनने आलो. लोक म्हणतील राजे चार्टर प्लेनने येतात आणि आरक्षणाची मागणी करतात. पण आरक्षण मला नकोच आहे. 85 टक्के गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी माझी भूमिका आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.काय जोर लावायचा तो लावा आणि हे आरक्षण टिकवा, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना माझी विनंती आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER