मराठा आरक्षणाची मंगळवारी सुनावणी

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वाेच्च न्यायालयात असून मंगळवारी(दि. १९) रोजी सुनावणी होणार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर सकारात्मक भुमिका मांडण्यात यावी यासाठी, मुख्य सचिवांना सूचना करण्यात याव्यात अशा विनंतीचे पत्र याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी रविवारी (ता. १७) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहीले.

पत्रातून ते म्हणतात,

दिल्ली येथे सर्वाेच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत १९ नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. या सुनावणीदरम्यान महाराष्ट्राच्या वतीने मराठा आरक्षणाची सकारात्मक भूमिका मांडण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात याव्यात. सुनावणीदरम्यान योग्य त्या विधी तज्ञांना महाराष्ट्राच्या वतीने मराठा आराक्षणाची बाजू मांडण्यासाठी उभे करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.