ठाकरे सरकारची परीक्षा ! मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी

Supreme Court - Maratha Reservation - Uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अंतिम सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी वेळी न्यायालयानं मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, या प्रकरणावर पाच दिवस आधी म्हणजेच आजपासून (२० जानेवारी) सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं हे प्रकरण पाच सदस्यीय घटनांपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. मात्र, ९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता. तसेच २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असं सांगितलं होतं. मात्र, आजपासूनच या प्रकरणावर सुनावणी सुरू होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER