मराठा आरक्षणाच्या प्रतिज्ञापत्रावर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी

मुंबई : राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

आजच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हायकोर्ट परिसरात दंगलविरोधी पथक देखील तैनात करण्यात आलं होत.

आरक्षण देण्यात यावे, सोबतच कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या ही जास्त असल्याचं, प्रतिज्ञापत्र सरकारनं सादर केलं आहे.