मराठा आरक्षण : आमदारांच्या दारात हलगी बजाव आंदोलन

मराठा आरक्षण - दारात हलगी बजाव आंदोलन

सांगली : मराठा क्रांती मोर्चातर्फे (Maratha Kranti Morcha) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२२) रोजी भर पावसात सांगली (Sangli) आणि मिरज येथील आमदारांच्या दारात हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. आमदार सुरेश खाडे यांच्या विश्रामबाग येथील निवासस्थानासमोर आणि आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांच्या विश्रामबाग येथील कार्यलयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई डॉ . संजय पाटील, नितीन चव्हाण आणि मराठा समाजाचे (Maratha Community) पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

तसेच यापुढेही जिल्हाभर प्रत्येक आमदार, खासदारांच्या दारात असेच आंदोलन केले जाणार आहे. तर त्या-त्या तालुक्यातील क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते त्याचे नियोजन करत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास देसाई (Vilas Desai) यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER