मराठा आरक्षण : सरकार गंभीर नाही- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यास सुप्रीम कोर्टाने बुधवारी नकार दिला. २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होईल, असे कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहिल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर नाही.

सुनावणी दरम्यान एकही मंत्री दिल्लीत पोहचला नाही, असा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षणावरील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वकिलांनी मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी कोर्टाकेडे केली. अॅड. मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि नोकरभरतीसंबंधीच्या नुकसानीचा मुद्दा कोर्टासमोर मांडला.
ताकदीने केस लढवायला हवी होती; मात्र सरकार गंभीर नाही

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी महाविकास आघाडी सरकार पूर्ण तयारीनिशी जाईल आणि स्थगिती उठविली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी सिरिअस नाही. सरकारला कसलेही गांभीर्य  नाही. महाविकास आघाडीचा एकही मंत्री आणि अॅडव्होकेट जनरल सुनावणी दरम्यान दिल्लीत पोहचले नाहीत. कोर्टासमोर सुनावणी दरम्यान नवीन काहीच मुद्दे मांडले नाहीत.  सरकारने, अतिशय ताकदीने केस लढवायला पाहिजे होती, ती लढविली नाही. मराठा समाजातील तरुणांसमोर प्रचंड अंधार आहे. सरकारला कुठलीही दिशा नाही. त्यामुळे वकिलांनाही कुठलीही दिशा नाही.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER