मराठा आरक्षण: सरकार सक्षम, कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार – अशोक चव्हाण

Ashok Chavan

मुंबई :  मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रिम कोर्टातून (SC) स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये वादंग उठले आहे. तर, महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण मिळणारच यावर ठाम आहेत.

फडणवीस सरकारने मराठा आरक्षण दिले मात्र, सुप्रिम कोर्टाने ते स्थगित ठेवले असे विधान शरद पवार (Sharad pawar) यांनी केले. त्यानंतर मराठा आरक्षण समितीचे नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच, मराठा आरक्षणावरील स्थगितीवर तोडगा काढण्यास सरकार सक्षम असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत त्यांना कोणताही फटका बसणार नाही.मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाही त्यांच्यासंदर्भात सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले, अंतिम निर्णयापूर्वी मराठा समाजातील प्रतिनिधींशी चर्चा करणार. तसेच काही जणांकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आरक्षणाबाबत मंगळवारपर्यंत पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच, आरक्षणावरून काही जण राजकारण करत आहेत. मात्र, मराठा आरक्षणावरील स्थगितीवर तोडगा काढण्यास सरकार सक्षम आहे असे चव्हाण म्हणाले. ते एबीपी माझा सोबत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER