‘शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात; मराठा आरक्षणावर का नाही? निलेश राणेंचा सवाल

Nilesh Rane & sharad Pawar

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे . यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सगळ्या विषयांवर बोलतात, पण मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ते अद्याप एक चकार शब्दही बोलले नाहीत. असे का?,’ असा थेट सवाल माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे.

कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पवारांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत राणेंनी ट्वीट केले आहे . राणे आपल्या म्हणाले की , ‘पवार साहेब सगळ्या विषयांवर बोलतात पण अजून पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही. मुस्लिम समाजाच्या एका सणासाठी पवार साहेबांनी मुंबईत येऊन बैठक घेतली होती, तशी बैठक मराठा समाजासाठी का घेतली नाही,’ असा प्रश्नही निलेश राणे यांनी उपस्थित केला.

शरद पवारांबरोबरच नीलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिगटाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले. ‘न्यायालयाचा निर्णय येऊन चार दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. अशोक चव्हाण यांच्या कामाचा आम्हाला अनुभव आहे. ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाहीत व पूर्णत्वास नेऊ शकत नाहीत. त्यावर मुख्यमंत्र्याचे काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल,’ असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.

:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER