मराठा आरक्षण : कलम १०२ बाबत फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल फडणवीसांनी केंद्र सरकारचे केले स्वागत

Maharashtra Today

मुंबई :- कलम १०२ बाबत फेरविचार करा, अशी याचिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात (SC) दाखल केली आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचे स्वागत केले आहे.

याबाबत उल्लेखनीय आहे की, मराठा आरक्षणाबाबत १०२ वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्यांना ओबीसी यादीत समावेशाचे अधिकार नाहीत, अस निर्णय खंडपीठाने दिला होता. १०२ व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाही याबाबत बराच उहापोह झाला होता. खंडपीठाने हे अधिकार आता राज्यांना नाहीत असा निर्वाळा दिला होता. पण केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान देत आहे. म्हणजे एक प्रकारे राज्यांना हे अधिकार आहेत असे केंद्राचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारचे आभार – फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात म्हटलं आहे की, १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारांना नाहीत, असा चुकीचा अर्थ काढला जात होता. वस्तुतः केंद्र सरकारने आधीपासूनच ही भूमिका घेतली होती की, हे अधिकार राज्यांनाच आहेत आणि ते केंद्राने स्वतःकडे घेतलेले नाहीत. आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केंद्र सरकारने हीच भूमिका घेतली. आम्ही सुद्धा वारंवार हेच सांगत होतो. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. तशीही ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केलेलीच आहे. तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button