
मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) दिलेल्या अंतरिम स्थगितीवर घटनापीठापुढे येत्या २५ तारखेपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. या सुनावणीसाठी वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंह थोरात (Vijaysinh Thorat) यांच्यावर जबाबदारी सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल घेतला. मराठी संघटनांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या मराठा आरक्षण विषयातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे विजयसिंह थोरात यांना प्रामुख्याने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला