आरक्षण; काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

औरंगाबाद : मराठा समाजासह धनगर, मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मागणीसाठी सिल्लोड-सोयगाव विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राजीनामा दिला आहे. विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे.

सत्तार यांनी मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा करून हा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. मराठा आरक्षणचा मुद्दा सध्दा पेटलेला असताना भाजप सरकार मराठा आरक्षणाला बगल देत असल्याची भावना निर्माण झाली आहे. हे सरकार मराठा आरक्षणासह इतर सर्वच पातळ्यावर अपयशी ठरले आहे. मला जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्या मागण्यांना आमदार असताना न्याय देऊ शकलो नाही. यामुळे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून हा देखावा नसून मी प्रधान सचिव कडे राजीनामा दिला आहे. असेही सत्तार यांनी म्हटले आहे.

दम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात आज विधिमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यतेखाली काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पक्षातील सर्वच आमदारांनी राजीनामे द्यावे असा प्रस्ताव या बैठकीत आला असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.