मराठा आरक्षण : काँग्रेसच्या मराठा मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत; विखे-पाटलांची मागणी

Radhakrishna Vikhe Patil - Maratha Reservation - Congress

नगर : भाजपमध्ये (BJP) प्रवेश घेतल्यानंतर माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेस(Congress) नेत्यांना डिवचल्याची एकही संधी सोडली नाही. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विखेंनी आघाडीतील काँग्रेस मंत्र्यांना डिवचले आहे. ‘मराठा आरक्षणसंबंधी (Maratha Reservation) काँग्रेस पक्षाचा हेतु प्रामाणिक असेल, तर सरकारमधील काँग्रेसच्या मराठा मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत.’ अशी मागणी विखे-पाटलांनी केली आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विखे-पाटलांनी आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निकाल विरोधात गेला, हे आघाडी सरकारचे अपयश आहे. या प्रकरणाची सुनावणी ज्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेली होती, त्यापैकी तीन न्यायमूर्तींचे मत आरक्षणाच्या विरोधात होते. त्यामुळे राज्य सरकारच्यावतीने अर्ज करून खंडपीठ बदलण्याची मागणी करणे आवश्यक होते. मात्र, तसा प्रयत्न सरकारने केला नाही. राज्य सरकारच्या हातात परिस्थिती असताना त्यांनी काही केलेले नाही. आता केंद्राकडे विनंती करत आहेत.”

आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी राजीमाने द्यावे. आता सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेसने अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना बोलावावे, त्यांची भूमिका विचारावी. तरच हेतु प्रामाणिक आहे, असे म्हणता येईल. मराठा समाजातील अशांतता लक्षात घेता सर्व संघटनांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे. त्यामुळे श्रेयवादाला थारा न देता आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही विखे-पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button