मराठा आरक्षण : चव्हाणांची ‘सह्याद्री’वर तर फडणवीसांची ‘सागर’वर महत्त्वाची बैठक

Devendra Fadnavis - Ashok Chavhan - Maharashtra Today

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरवण्यासाठी सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू झाली आहे. तर मराठा आरक्षणावर दिशा ठरवण्यासाठी भाजपनेही बैठक बोलावली आहे. या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर केंद्राने आरक्षणप्रश्नी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होत आहे.

या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबतही चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नव्याने मागास वर्ग आयोग स्थापन करणे आणि डेडलाईनच्या आत मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल तयार करणे, याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपची बैठक

एककीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू असतानाच भाजपनेही मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रसाद लाडही उपस्थित आहेत.

या बैठकीत मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञांची  समिती स्थापन करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या समितीतील सदस्यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोर्टात सरकारच्या कोणकोणत्या चुकांमुळे मराठा आरक्षण रद्द झाले, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. या समितीच्या निष्कर्षावरून भाजप सरकारची पोलखोल होणार आहे. भाजपच्या या बैठकीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button