मराठा आरक्षण रद्द : ‘कोण म्हणतो देणार नाय… घेतल्याशिवाय राहणार नाय’ मराठा क्रांतीचे आंदोलन

maratha-reservation

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (maratha-reservation) रद्द केले आहे. या निर्णयानंतर पुण्यात नवी पेठ येथे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी यांनी काळ्या फिती बांधून मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला . यासोबतच जोरदार नारेबाजी केली . “‘एक मराठा… लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं”, “कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय” या आणि अशा अनेक घोषणा नवी पेठ येथे जमलेल्या मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

यादरम्यान मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे , धनंजय जाधव, तुषार काकडे , रघुनाथ चित्रे , बाळासाहेब आमराळे सहभागी झालेत. तर सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button