मराठा आरक्षण रद्द : जयंत पाटील पंतप्रधान मोदींची भेट घेणार!

Jayant Patil - PM Narendra Modi

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द ठरवले. यावरून राज्यातील मराठा समाज (Maratha Community) आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. पाठोपाठ खासदार संभाजीराजे यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठे विधान केले आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहे. आरक्षण मुद्द्यावरून त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

“मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयात वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबाबत आता संसदेत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधानांशी भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करणार आहे,” अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button