मराठा आरक्षण : पुण्यातील बैठकीला साताऱ्याचे दोन्ही राजे राहणार उपस्थित

Udayan Raje Bhosle-Shivendra Raje Bhosale

सातारा :  मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) वज्रमूठ राजधानी कोल्हापूर आणि साताऱ्यात आवळली जात आहे. कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले आहेत.

येत्या आंदोलनाला आता खऱ्या अर्थाने आणखी धार येणार आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) 3 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणाऱ्या विचार मंथन बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी दिलेले निमंत्रण खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांनी स्वीकारले. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दि. 3 ऑक्टोबरच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षणासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरण्यास तयार झाला असून आरक्षणाचे नेतृत्व खा. संभाजी राजे छत्रपती, खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांनी करावे, अशी अनेकांची भावना आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुणे येथे होणाऱ्या विचार मंथन बैठकीत मराठा आरक्षण प्रश्न आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER