मराठा आरक्षण : भाजपाने केला आघाडी सरकारचा निषेध

BJP protested against the alliance government

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय काल जाहीर केला या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाज आतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौक येथे महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेबद्दल निषेध केला.

“महा विकास आघाडी सरकारचा धिक्कार असो”, “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे”, “मराठा समाजाला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देऊन बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.

मागील युती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेली ५० वर्षे प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न ताकदीने सोडवला होता. परंतु दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्याची वेळ आल्यावर या आरक्षणाला तात्पुर्ती स्थगिती मिळाली आहे. या समितीचे मुख्य अशोक चव्हाण यांच्या या स्थगितीच्या प्रतिक्रियेबद्दल निषेध व्यक्त केला. ज्या पद्धतीने मागील फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली सक्षम भूमिका घेऊन टिकाऊ आरक्षण दिले होते जे हायकोर्टाने मान्य केले होते परंतु हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यावर महाराष्ट्रातील सरकार बदलेले होते आणि महाविकास आघाडीचे सरकार आले होते. या महाविकास आघाडी सरकारने या आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार व अभ्यास न करता आपली भूमिका व्यवस्थित न मांडता आल्यामुळे सुप्रीम कोर्टाने या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्याबद्दल या अकार्यक्षम महाविकास आघाडीचा निषेध करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

गटनेते नगरसेवक अजित ठाणेकर, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER