मराठा आरक्षण : भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्यांचा समावेश; नरेंद्र पाटलांचा आरोप

narendra patil - Maharashtra Today

बीड : मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व स्तरावरून मागणी होत आहे. या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत मराठाद्वेषी सदस्यांचा समावेश आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला आहे.

नरेंद्र पाटील यांनी उद्या बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील यांनी भोसले समितीत मराठा द्वेषी सदस्य असल्याचा आरोप केला. मराठा समाजाला निधी देण्याची आणि योजना जाहीर करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मराठा समाजाला सहकार्य करण्याचे काम करत नाही. काँग्रेसची आरक्षणाबाबतची नेमकी भूमिका काय आहे, हे त्यांनी पुढे येऊन सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.

आत्महत्या केली

“माझे वडील काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर काहीच निर्णय झाला नाही. काँग्रेसने आरक्षणासाठी १९८२ साली कोणतीच समिती स्थापन केली नसून माझ्या वडिलांनी आत्महत्या केली.” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

२५ हजार उद्योजक निर्माण

शिवसेना आणि भाजपने मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी योजना सुरू केल्या. फडणवीसांनीच शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळेच २५ हजार मराठा उद्योजक निर्माण झाले, असा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button