मराठा आरक्षण : मातोश्रीच्या दारात करणार आंदोलन

maratha reservation

कोल्हापूर :- आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न निकाली निघेपर्यंत परीक्षा पुढे ढकला. जबरदस्तीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न झाल्यास परीक्षा केंद्र फोडू, असा इशारा देत मराठा समाजाचे नेते आबा पाटील (Aba Patil) यांनी दिला. ६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील मातोश्रीवर आंदोलन करण्याचा इशारा आज कोल्हापुरात दिला. सरकारने समाजाची दिशाभूल थांबवावी. स्थगिती कधी उठणार हे सांगावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आबा पाटील (Aba Patil) म्हणाले, मोर्च्याची सुरुवात कोल्हापुरात करणार आहे. मराठा आरक्षणामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम, सुप्रीम कोर्टात भूमिका सरकारने मांडली नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगिती आली. प्रवेश प्रक्रिया रखडली. राज्यसेवा परीक्षा, इतर भरतीत कोणत्या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविणार हे स्पष्ट करा. २०१४ ला भरती रखडली आहे.

या परीक्षा पुढे ढकला. मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाबाबत काहीही देणेघेणे राहिलेले नाही. मराठा आंदोलकांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली नाही. त्यांनी आता बाहेर पडून स्पष्ट भूमिका घ्यावी.

प्रवेश, नाेकर भरती, राज्य सेवा याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. सरकारला  चर्चेसाठी एक संधी देत आहे. सोमवारी ५ तारखेपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा मातोश्रीपुढे सर्व विद्यार्थी आणि समन्वयक यांच्यासोबत आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER