मराठा आरक्षण : महाराष्ट्राच्या एसईबीसी कायद्याला १०२ वी घटनादुरुस्ती लागू होत नाही – आशिष शेलार

Ashish Shelar - SEBC Act - Maratha Reservation

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज झालेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सुनावणीत १०२ व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा निघाला. यावरून काँग्रेसचे (Congress) आमदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फडणवीस सरकारवर (Fadnavis Government) टीका केली.

अशोक चव्हाण यांचे म्हणणे चूक आहे, असे म्हणताना भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणालेत –१०२ वी घटनादुरुस्ती होण्याच्या आधीचा महाराष्ट्राचा कायदा असल्याने महाराष्ट्राच्या SEBC कायद्याला ती घटनादुरुस्ती लागू होत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचा कायदा या घटनादुरुस्तीच्या आधीचा असल्याने महाराष्ट्राच्या कायद्याला ही घटनादुरुस्ती लागू होत नाही, असे उच्च न्यायालयानेसुद्धा हा कायदा कायम ठेवताना आपल्या आदेशात नमूद केले होते.

आज केंद्र सरकारच्यावतीने जी बाजू मांडण्यात आली, त्यात कुठेही राज्याच्या कायद्याला विरोध करण्यात आला नाही. केंद्राचे महाधिवक्ता यांना केवळ EWS आरक्षणापुरती नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी केवळ त्या विषयापुरती बाजू मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER