भुजबळ, वडेट्टीवारांचे मंत्रीपद काढून घ्या, मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आणि मंत्र्यांकडून सुरू असलेlला वाद आता थेट राज भवनात पोचला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे.

आज मराठा क्रांती मोर्चाच्या 15 समन्वयकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या आंदोलकांनी राज्यपालांकडे आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन दिलं आहे. तसेच भुजबळ आणि वडेट्टीवार यांचीही तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते सातत्याने चुकीची विधाने करून दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. तसं निवेदनही त्यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER