… तरीही मराठा मोर्चा निघणारच : विनायक मेटे

Vinayak Mete

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा निघणार आहे . बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार , असा निर्धार मेटे यांनी केला .

तत्पूर्वी मेटे यांनी नारायणगडाचे दर्शन घेतले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे घातले आहे. बीडमध्ये मराठा मोर्चा निघणार आहे. कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा हा निघणार आहे. तसेच हा मोर्चा यशस्वी करु. सध्या बीडमध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करावे , मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असा इशारा विनायक मेटेंनी दिला आहे.

दरम्यान बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चासाठी पोलिसांचा कड़ेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . बीडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button