मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा

Parth Pawar - Maratha Reservation - Suicide

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र सुरू झालं आहे. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील केतूरा गावात ही घटना घडली आहे. १८ वर्षाच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल, अशी प्रतिक्रिया विवेकच्या आई-वडिलांनी दिली.

एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटना आक्रमक होत असताना आता या लढ्यात राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ (Parth Pawar) यांनी उडी घेतली आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे, असे म्हणत पार्थ पवार यांनी मराठा नेत्यांना जागं होण्याची गरज असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या घटनेतील मृत तरुणाचा फोटो आणि त्याने लिहिलेली चिठ्ठी शेअर करत, पार्थ पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जागं होण्याचं आवाहन केलं आहे. विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पीढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सध्यातरी, मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी या पेटलेल्या मशालीला स्वत:च्या ह्रदयात स्थान देऊन विवेक आणि कोट्यवधी असहाय विवेक यांच्या न्यायासाठी दरवाजे ठोठावणार असल्याचा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून युवकाची आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER