‘पवारसाहेब, इकडे लक्ष द्या !’ मराठा क्रांती मोर्च्याचे आझाद मैदानात बॅनर्स

maratha-kranti-thok-morcha-protest-in-azad-maidan-mumbai

मुंबई : मुंबईतल्या आझाद मैदानातील (azad-maidan-mumbai) शेतकरी मोर्च्याला राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दर्शविला . पवार आझाद मैदानात दाखल झाले आहेत . या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. पवारांनी आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं म्हणून मराठा मोर्च्याच्या (Maratha Morcha) कार्यकर्त्यांनी ‘पवारसाहेब, इकडेही लक्ष द्या’, असा मजकूर लिहिलेले पोस्टर आणि बॅनर्स आझाद मैदानात झळकवले आहेत.

मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण, नोकर भरती, नोकर भरतीतील नियुक्त्या आदी विविध मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात येत आहे. काल रविवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. आजही मराठा क्रांती ठोक मोर्च्याचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. याच वेळी आझाद मैदानात दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान मराठा आंदोलक आज दुपारी हे बॅनर्स घेऊन शेतकरी मोर्च्याच्या दिशेने घोषणा देत निघाले होते. पवारांनी आपल्या मागण्यांकडेही लक्ष द्यावे या हेतूने ते शेतकरी मोर्च्याकडे निघाले होते. मात्र, शेतकरी मोर्च्यात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना मध्येच आडवले. त्यामुळे या मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनस्थळी थांबून जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER