मराठा क्रांती मूक मोर्चा ही वादळापूर्वीची शांतता; संभाजीराजेंचा इशारा

Sambhaji Raje

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी येत्या १६ तारखेला कोल्हापुरातून मोर्च्याची हाक संभाजीराजे यांनी दिली आहे. आता त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे लिहून संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी फेसबुक पोस्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वीच संभाजीराजेंनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत मराठा लोकप्रतिनिधींना इशारा दिला. ‘मी भूमिका मांडल्यानंतर मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केले तर बघा’ असा इशाराही त्यांनी दिला होता. या संदर्भात आमदार आणि खासदार निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button