शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

maratha-kranti-morcha-will-gather-in-front-of-shiv-sena-bhavan-on-19th-february-to-celebrate-shiv-jayanti

मुंबई : राज्य सरकारने शिवजयंतीच्या सोहळ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्च्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला झालेली गर्दी किंवा शरद पवारांचा (Sharad Pawar) वाढदिवस असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा यावेळी झालेली गर्दी, त्यामुळे करोना होत नाही का, असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला विचारण्यात आला आहे.

मात्र, पोलिसांनी काही वेळातच शिवसेना भवनासमोर लावलेले बॅनर उतरवले. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा (Maratha-kranti-morcha) काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या सोहळ्यावर लादलेल्या निर्बंधांमुळे राज्य सरकारवर सध्या टीकेचा भडिमार होत आहे. राज्य सरकारने शिवजयंतीच्या दिवशी मुंबईत १४४ कलम लागू करण्याचाही निर्णय घेतला आहे. परिणामी विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER